Home मराठी बातम्या राजकारण सिद्धरामय्या ‘सीएम’ शिवकुमार ‘डीसीएम’

सिद्धरामय्या ‘सीएम’ शिवकुमार ‘डीसीएम’

सिद्धरामय्या 'सीएम' शिवकुमार 'डीसीएम'

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील. तर, डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. नवीन सरकारचा उद्या, शनिवारी 20 मे रोजी बेंगळुरू येथे शपथविधी होणार आहे.

सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची गुरुवारी संध्याकाळी बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

शिवकुमार यांनी बुधवारी रात्री सुरजेवाला यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धरामय्या यांनी रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली. दिवसभर चाललेल्या राजकीय रस्सीखेचानंतर रात्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवण्याचा निर्णय़ झाला.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जांगासाठी मतदान झाले. यापैकी 135 जागेवर काँग्रेसने झेंडा फडकावत बहुमत मिळवले. तर, सत्ताधारी भाजपला केवळ 65 जांगावर विजय मिळवता आला. जनता दल (सेक्युलर) पक्षालाही साजेशी कामगिरी करता आली नाही. जेडीएसला केवळ 19 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत काँग्रेसला 42.9 टक्के आणि भाजपला 36 टक्के मते मिळाली. तर, जनता दलाला 13.3 टक्के मते मिळाली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.