Home मराठी बातम्या राजकारण येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर “मेस्मा” लावतील – नरसय्या आडम

येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर “मेस्मा” लावतील – नरसय्या आडम

येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर "मेस्मा" लावतील - नरसय्या आडम

सोलापूर 16 मार्च (सूत्र) राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच “मेस्मा” कायदा मंजूर करून घेतला आहे. याला सत्ताधारीच काय? विरोधी एकाही पक्षाने यास विरोधच काय? चर्चाही न करता मंजूर केला, ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे तुम्ही आता “मेस्मा” लावा. येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला “मेस्मा” लावतील, असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाना दिला आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपाच्या त्यांना मार्गदर्शन करताना आमदार आडम बोलत होते. आडम यांनी एक लाख रुपयाचा लढा निधीही या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला. आता राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. २०३५ पासून थोडा-थोडा आर्थिक भार पडणार असताना समिती स्थापन करण्याचे नाटक कशासाठी करता. त्यासाठी तुम्ही जुनी पेन्शन योजना जाहीर करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्या अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.