Home मराठी बातम्या राजकारण राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

मुंबई, १५ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली. त्यांची विनंती मान्य करत ईडीने त्यांना एक आठवड्यानंतरची तारीख दिली आहे.

कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही – पाटील

दरम्यान जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला जाईल. मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी म्हटले आहे की, ज्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे.

राज ठाकरेंनाही पाठवली होती नोटीस

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली असतनाही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधी या कंपनीप्रकरणी राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळल्याने पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.