Home मराठी बातम्या राजकारण सहकारातून क्रांती घडविण्याची वरुडची क्षमता – खा. डॉ. अनिल बोंडे

सहकारातून क्रांती घडविण्याची वरुडची क्षमता – खा. डॉ. अनिल बोंडे

सहकारातून क्रांती घडविण्याची वरुडची क्षमता – खा. डॉ. अनिल बोंडे

अमरावती, 14 मे (हिं.स.): संत्रा प्रक्रिया केंद्र, गुरांचा बाजार, कापसाचे होणारे उत्पादन, शेतकरी गटांच्या माध्यमातून समृद्धीसाठी सुरू असलेले प्रयत्न, पाणी वापर संस्थांनी घेतलेली भरारी यासह शेतकऱ्याला मजबुती देण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या वरुड तालुक्यामध्ये सहकारातून क्रांती घडवण्याची क्षमता असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे केले. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणूकीमध्ये खासदार डॉ.अनिल बोंडे व माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलला एकहाती सत्ता मिळाल्यामुळे रविवारी नवनियुक्त संचालकांचा स्नेहमिलन व मतदार आभार सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान मार्गदर्शन करताना खासदार डॉ.अनिल बोंडे हे बोलत होते. प्रारंभी डॉ. बोंडे यांनी निवडून आलेल्या सर्व संचालक व मतदार कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

ते म्हणाले, सर्व नवनियुक्त संचालकांनी वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्वकश विकास करण्यासाठी प्रयत्न करावे. महाराष्ट्रामध्ये विकासाच्या प्रगतीपथावर असलेल्या बाजार समित्यांचा दौरा करून त्यांच्या कामकाजाची पाहणी करावी. व्यापारी सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करावे. चांगल्या बाजार समित्यांचा आदर्श सर्व संचालकांनी डोळ्यासमोर ठेवावा काम करावे. इतिहासात कधी नव्हे पहिल्यांदा केंद्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकाराच्या विकासाची जबाबदारी देत सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार देशभरातील सेवा सहकारी सोसायट्यांचा विकास झपाट्याने होत आहे. विविध प्रकारची २७ कामे सोसायट्यांना सोपविण्यात आली आहे. कॉमन सर्विस सेंटर पासून ते पेट्रोलपंपापर्यंत अशा विविध कामांचा त्यामध्ये समावेश आहे. सहकारी सोसायट्यांचे संपूर्ण संगनिकीकरण करणे, महिला बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपन्या इत्यादींचा विकास करण्यावर केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. सहकाराला बळकटी देण्यासाठी केंद्रीय सहकार खात्याने विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत सहकारी सोसायटी, महिला बचत गट, ग्रामपंचायत इत्यादींना देण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. तरुण महिलांनी पुढे यावे. त्यांनी बाजार समितीच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी व्हावे. तसेच आठवड्याच्या शेतकरी गटाचे उदाहरण देत डॉ.बोंडे यांनी अशा कामाचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन सुद्धा यावेळी केले. नागठाणा व कपिलेश्वर पाणी वापर संस्था राज्य पातळीवर अग्रणी ठरत असल्याने सहकारातून मोठा नफा त्यांना मिळत आहे. यातून त्यांच्या कार्याचा विस्तार होत आहे. त्यामुळे सहकार हा स्वाहाकार न होता तो संस्कारासारखा असला पाहिजे असा उल्लेख सुद्धा त्यांनी केला.

प्रलोभन देणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला

बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून प्रलोभन दाखविण्यात आले. मात्र असे असतानाही मतदारांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत त्यांना घरचा रस्ता दाखविल्याबद्दल सर्व मतदारांचे डॉ. अनिल बोंडे यांनी आभार मानले. तर विरोधकांवर शरसंधान साधताना ते म्हणाले, विरोधक क्रमांक एकचे डाकू आहेत. त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये तिरस्कार आहे. बाजार समिती त्यांनी विकून खालली असती. अडीच वर्षापासून वरुड-मोर्शीच्या विकासाला खीळ बसली होती. मात्र पुन्हा आता झपाट्याने विकास सुरू झालेला असल्याचेही डॉ.अनिल बोंडे म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.