Home राजकारण लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

लांज्यातील राजू कुरूप यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल

रत्नागिरी, 14 मे, (हिं. स.) : लांज्यातील राजू कुरूप यांच्या नेतृत्वाखाली लांज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.

लांजा शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य खरेदी विक्री संघाचे सदस्य गणेश लाखण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लांज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, लांज्याचे नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते. लांजा शहरात ठाकरे गटाला जोरदार हादरा बसला आहे. काही दिवसांत अनेक विद्यमान सरपंचही प्रवेश होणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.