Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे – संग्राम जगताप

विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे – संग्राम जगताप

विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे - संग्राम जगताप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) :- नगर शहरातील मुख्य बाजार पेठातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. या रस्त्याच्या विकास कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याची कामे होऊ शकली नाही. आता या अडचणी दूर केल्या असून डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. जिल्हाभरातून ग्राहक व्यापारासाठी नगर शहरामध्ये येत असतात. व्यापार व बाजारपेठेला चालना मिळावी यासाठी सुविधा देणे गरजेचे आहे, दाळ मंडईतील रस्ता खराब झाल्यामुळे हमाल व व्यापारी यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. आता शहरामध्ये विविध भागांमध्ये विकासाची कामे सुरू आहेत आचार्य परमपूज्य आनंदऋषीजी म.सा यांच्या निर्वाण दिनानिमित्त शांती मार्च व महावीर जयंती निमित्त नगर शहरातून मिरवणूक निघत असते. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभाग होत असतात. विविध सामाजिक संस्थांनी या रस्त्याची कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी पाठपुरावा केला त्यानुसार आज मुख्य बाजारपेठेतील रस्ता डांबरीकरणाची कामे सुरू केले आहे. विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे. नगरकरांच्या सहकार्यामुळेच शहर विकासाला गती देऊ शकलो आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नगर शहरातील मुख्य बाजारपेठातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ दाळ मंडई येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

नगरसेवक अविनाश घुले म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्यामुळेच शहरांमध्ये विविध विकासाची कामे सुरू आहे. नियोजनबद्ध कामामुळे शहर विकासाचे चित्र बदलताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील बहुतांश विकासाची कामे पूर्ण झाली आहे उरलेली कामे ही तातडीने मार्गी लावले जातील असे ते म्हणाले.कमलेश भंडारी म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे नगर शहरात आज अनेक विकास कामे मार्गी लागत आहे. याचबरोबर त्यांनी प.पु. आनंदऋषी महाराज यांच्या धार्मिक परीक्षा बोर्ड जवळील सर्वच रस्त्याचे कामे पूर्ण केले आहे या ठिकाणी समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविक वर्ग संपूर्ण भारत देशातून येत असतात. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळेच विकासाची कामे मार्गी लागली जात आहे. या सर्व कामाचे श्रेय आमदार संग्राम जगताप यांना जात आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ दाळ मंडई. अडते बाजार, जुना बाजार, चितळे रोड, महाजन गल्ली, नवी पेठ यासारख्या भागातील रस्ते अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यातील बहुतांश रस्त्यावर बीबीएमचे कामही पूर्ण झाले आहे. त्यावर फक्त डांबरीकरण करणे बाकी असून येथे 28 मार्च रोजी परमपूज्य आनंदऋषीजी महाराज यांच्या निर्वाण दिनानिमित्त शांती मार्च निघणार आहे. तसेच भगवान महावीर स्वामींची जयंती निमित्त मिरवणूक निघत असते. त्यामध्ये हजारो नागरिक लहान मुले महिला समाज बांधव सहभाग घेत असतात.त्याचबरोबर चौकाचौका त सजावट करून प्रसाद वाटप करण्यात येते. मिरवणूक मार्गावरील रस्ता डांबरीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने रस्त्याची कामे सुरू केली आहे. याबद्दल आम्ही सर्व व्यापारी बांधव आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानत आहे असे ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.