Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

बुलडाणा, 11 मे, (हिं.स) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने घरकुल, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्याच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा आज नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, प्रकल्प संचालक श्रीमती पवार आदी उपस्थित होते.

खा. जाधव म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने रस्ते बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चिखली मेहकर, चिखली जालना, शेगाव खामगाव या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. शेगाव खामगाव या रस्त्यावरील 120 मीटरचे काम रखडले आहे. आवश्यक ती मदत घेऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच काही रस्ते आणि पुलांचे कामे सदोष झाले आहेत. त्यावर योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी कामे करावीत. राष्ट्रीय महामार्गाची काही ठिकाणी उंची वाढली आहे. त्यामुळे पोचमार्गाची योग्य दुरूस्ती करावी.

सिंचन प्रकल्पांमुळे गावांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहे. जिगाव प्रकल्पातील तीन गावांचे पूनर्वसन अद्यापही होणे आहे. जून 2024 पासून पाणी साठविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पूनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा आधार ठरत आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिककर्जाच्या वेळी सीबिलची अट रद्द करण्यात आली आहे. यावर्षी 1470 कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज मिळण्यासाठी बँकांना सूचना देण्यात याव्यात. जलजीवन मिशन अंतर्गत 681 कामे करण्यात येत आहे. यात असून 16 योजना घेण्यात आल्या आहे. यावर 161 कोटी रूपये खर्च होणार आहे. या योजनांबाबत येणाऱ्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात यावी. कामे योग्य पद्धतीने होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. कामे योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याशिवाय देयक अदा करण्यात येऊ नये.

महिलांसाठी बचतगटांची स्थापना करण्यात येत आहे. यातून ग्रामीण आणि शहरी भागात चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे बचतगटांना योग्य ती मदत करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेतून 44 हजार घरांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही जाधव यांनी दिल्या.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्नामुळे लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या असलेल्या गावांची दखल तातडीने घेण्यात यावी. गावात भेट देऊन नागरिकांची समस्या जाणून घ्यावी. तसेच याठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.