Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे राजकीय गटातटाच्या वादात विकासकामे अडकली

राजकीय गटातटाच्या वादात विकासकामे अडकली

राजकीय गटातटाच्या वादात विकासकामे अडकली

डोंबिवली, २८ मे, (हिं.स) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून तलावाच्या विकास कामच भूमिपूजन झालं होतं. खासदार निधी, आमदार निधी, महापालिकेचा निधी, नगरसेवक निधी असा सुमारे करोडो रुपयांचा निधी या विकासकामासाठी खर्ची होणार होता. पण या कामाच्यामध्ये राजकिय हेवेदावे आले आणि हे काम अडकून पडलं आहे. दशक्रिया विधीसाठी दुसरी जागा नाही. राजकारण व हेवेदावे बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी विकासकामे रोखू नका अशी विनंती सोनारपाडा येथील माजी सरपंच मुकेश पाटील यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने कानाडोळा न करता नागरिकांच्या हितासाठी कामे करा अशी मागणीही केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ती २७ गावं आणि पण विकास न होता समस्याच वाढल्या अशी ओरड आता प्रत्येक गावागावात होत आहे. सोनारपाडा गावात जेव्हा ग्रामपंचायत माध्यमातून कामे होत होती तेव्हा जनतेला त्रासदायक अशा कोणत्याच समस्या नव्हत्या. मात्र आता आमची गावं पालिकेत समाविष्ट झाली आणि आमचं गांव समस्याग्रस्त झालं आहे असे खुद्द माजी मुकेश पाटील यांचे म्हणणे आहे.

गटातटाच्या राजकारणात आमच्या सोनारपाडा येथील तलावाचं विकास काम अडकून पडले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही वेळोवेळी याबाबतची माहिती दिली. सुमारे 30 हजार लोकवस्ती असलेल्या गावातील लोकांसाठी दशक्रियाविधी करण्याचे तलाव हे महत्वाचे ठिकाण आहे. पण मध्यंतरी आलेला राजकीय भूकंप आणि गटातटाचे राजकारण यामध्ये सोनारपाडा गांव भरडला जात आहे. सोनारपाडा, माणगांव येथील नागरिक विविध विधींसाठी या तलावापाशी पाणवठा म्हणून येत असतात. पण येथील सर्व विकास काम अर्धवट अवस्थेत असल्याने त्याचा समाजाला त्रास होत आहे. पालिका प्रशासन कानाडोळा करीत असून मंजूर निधी असूनही काम का होत नाही असा सवाल ग्रामस्थ विचारात आहेत. तत्कालीन सरपंच म्हणून विविध माध्यमातून अनेक विकास कामे केली. पण आता हे तलावाचे काम होत नाही. दशक्रिया विधींसाठी येणाऱ्या लोकांना पाणी नाही, सभागृह नाही याची दाद कोणाकडे मागायची. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यामध्ये लक्ष देऊन हे रखडलेले विकास काम मार्गी लावावे असे सोनारपाडा येथील माजी सरपंच मुकेश पाटील यांनी विनंती केली आहे.

दरम्यान यावेळी दशक्रिया विधी कार्यक्रमसाठी उपस्थित असलेले सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनीही या रखडलेल्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सोनारपाडा येथील हा तलाव पुर्वपार अशा कार्यासाठी महत्वाचा असून येथील विकास काम ताबडतोब व्हावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन प्रयत्न करणारं असे सांगितले. २७ गावतील समस्या सोडवण्यासाठी समितीचा नेहमीच पुढाकार असतो असेही वझे म्हणाले.

सोनारपाडात पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट :

सोनारपाडा गावाचा विस्तार मोठा आसुन एम. आय. डी. सी कडुन पाण्याचा दाब कमी येत असल्यामुळे गावातील काही ठिकाणी नागरिकांना पाणी मिळत नाही. दावडी येथील मुख्य जलवाहिनीला जलपरी लावल्यामुळे सोनारपाडा प्रभागामध्ये येणाऱ्या पाण्याचा दाब अतिशय कमी झाला आहे. सोनारपाडा प्रभागामध्ये पाण्याचा दाब वाढवण्यासाठी भोपर, सांगल-सांगाव व दावडी या ठिकाणी जशा जलपरी लावण्यात आल्या आहेत तसे सोनारपाडा येथील मुख्य जलवाहिनीला जलपरी लावुन पाणी प्रश्न सोडविण्यात यावा तसेच जोपर्यंत पाणीप्रश्न आहे तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांची आहे.

नैसर्गिक नाळे बंद :

उबांर्ली, दावडी, सोनारपाडा विभागातील परिसरातुन वर्षानुवर्षे वाहत असणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह ए. पी. आर रियालिटी या बांधकाम व्यवसायिकाने मागील वर्षी जोंधळे कॉलेज ते स्वरांजली कॉम्पलेक्स व डॉ. पाटील यांच्या घरामागुन (१६ बंगले) यांच्या मधुन असलेल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये मातीचा भराव करून नैसर्गिक नाले बंद केला. परिणामी चाळीतील व इतर रहिवाश्यांच्या घरात शिरल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. नाळे बंद असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत न झाल्यास पावसाचे पाणी यंदाही तेथील रहिवाश्यांच्या घरात शिरून नागरिकांचे नुकसान होऊन परिसरात साथीचे आजार पासरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी आपण लवकरात लवकर सदर ठिकाणची पहाणी करून व्यवसायिकावर योग्य ती कारवाई करून नैसगिक नाले पुर्वरत करावे असेही पाटील सांगतात.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.