Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे छ. संभाजीनगर : शासन आपल्या दारी उपक्रमाचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

छ. संभाजीनगर : शासन आपल्या दारी उपक्रमाचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

छ. संभाजीनगर : शासन आपल्या दारी उपक्रमाचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर, 26 मे, (हिं.स.) ” शासन आपल्या दारी”या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमा अंतर्गत कन्नड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सुमारे ५५१ कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ थेट लाभधारकांना देण्यात आला. या लाभधारकांमधे कन्नडसह सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यातील लाभार्थी नागरिकांचा समावेश आहे.

यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या सर्वांगीण विकास योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नागरीकांना वेगवेगळ्या शासकिय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, एकाच जागी सर्व लाभधारकांना लाभ मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याची सुरुवात सर्वात आधी सातारा जिल्ह्यातील पाटण येथून करण्यात आली. आज या ठिकाणी मला यायला उशीर झाला तरीही आपण सर्व माझ्यासाठी थांबलात यावरून तुमचे माझ्यावरील प्रेम दिसुन येते. मी आणि उपमुख्यमंत्री यांनी थेट जनते पर्यंत जाऊन काम करण्याचे ठरविले आहे. हे सरकार सगळ्यांच्या मनातले सरकार असून लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या विविध योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढविण्यात आली आहे. अवकाळी गारपीट, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यासाठी महत्वाच्या असलेल्या वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी मोदी सरकार कडून निधी आणून पूर्ण केला जाईल.G २० परिषदेचा मान आपल्याला मोदींमुळे मिळाला मात्र विरोधक परदेशात जाऊन बदनामी करत असून काँग्रेसने आतापर्यंत गरिबाला गरीब ठेवण्याचे काम केले, केजरीवाल मुंबईत येवून सगळ्यांना भेटत आहे मात्र आपण कुणाच्या दारी जात नाही तर हे सरकारच आपल्या दारी येत आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.