Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे पुरी- हावडा वंदे भारत एक्सप्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

पुरी- हावडा वंदे भारत एक्सप्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

पुरी- हावडा वंदे भारत एक्सप्रेसला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

नवी दिल्ली, 18 मे (हिं.स.) : ओडिशातील जगन्नाथ-पुरी आणि पश्चिम बंगालच्या हावडा शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच त्यांनी ओडिशाला 8000 कोटी रुपयांचा प्रकल्प भेट दिला.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारत आणि महत्वाकांक्षी भारतीय या दोहोंचे प्रतीक बनत आहे. जेव्हा वंदे भारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा भारताचा वेग आणि भारताची प्रगती त्यात दिसून येते. आता कोलकाता ते पुरी येथे जायचे असो किंवा पुरी ते कोलकाता हा प्रवास फक्त साडेसहा तासांचा झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत भारताने अत्यंत कठीण जागतिक परिस्थितीतही विकासाचा वेग कायम ठेवला आहे. या विकासात प्रत्येक राज्याचा सहभाग आहे, प्रत्येक राज्याला बरोबर घेऊन देश पुढे जात आहे, हे त्यामागे एक मोठे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचा नवा भारत देखील तंत्रज्ञान स्वतः बनवत आहे आणि वेगाने नवीन सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात नेत आहे. भारताने ही वंदे भारत ट्रेन स्वतः बनवली आहे. आज भारत 5-जी तंत्रज्ञान स्वतः विकसित करत आहे आणि ते देशाच्या दूरवरच्या भागात घेऊन जात आहे.या विकासात प्रत्येक राज्याचा सहभाग आहे, प्रत्येक राज्याला बरोबर घेऊन देश पुढे जात आहे, हे त्यामागे एक मोठे कारण आहे. आजचा नवा भारत देखील तंत्रज्ञान स्वतः बनवत आहे आणि वेगाने नवीन सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात नेत आहे. भारताने ही वंदे भारत ट्रेन स्वतः बनवली आहे. आज भारत 5-जी तंत्रज्ञान स्वतः विकसित करत आहे आणि ते देशाच्या दूरवरच्या भागात घेऊन जात आहे असे मोदींनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.