Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी 41 दशलक्ष टन उत्पादनाचा ओलांडला टप्पा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी 41 दशलक्ष टन उत्पादनाचा ओलांडला टप्पा

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने सलग दुसऱ्या वर्षी 41 दशलक्ष टन उत्पादनाचा ओलांडला टप्पा

नवी दिल्ली, 5 एप्रिल (हिं.स.) : भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी, एनएमडीडी, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने यंदा, सलग दुसऱ्या वित्तीय वर्षी 41 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे. वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, 14.29 दशलक्ष टन उत्पादन आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च महिन्यात 5.6 दशलक्ष टन एवढे उत्पादन करत, या सरकारी लोहखनिज उत्पादक कंपनीने, आपल्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी चौथ्या तिमाहीतली आणि मासिक कमाई केली आहे.

एनएमडीडीच्या स्थापनेपासून बैलाडिला प्रदेशात सर्वाधिक 622 सेंटीमीटर पाऊस असूनही एनएमडीडीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, 41.22 दशलक्ष टन उत्पादन केले आणि 38.25 दशलक्ष टन लोहखनिजाची विक्री केली. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, कंपनीने 14.29 दशलक्ष टन उत्पादन नोंदवले जे स्थापनेपासूनच्या तिमाहीतील सर्वाधिक उत्पादन आहे.

पावसाळ्यातील आर्द्र हवामान असूनही एनएमडीसीने उत्पादनाचा हा विक्रमी टप्पा गाठला. त्यासाठी, जाम टाळण्यासाठी विशेष माइन लाइनर आणि खनिजांमधील आर्द्रता कमी करण्यासाठी पाणी शोषक पॉलिमर वापरून आर्द्रता कमी केली गेली. तसेच, आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने या वर्षात तिची उत्खनन क्षमता देखील वाढवली.

कंपनीच्या या उत्तम कामगिरीवर भाष्य करताना, मुख्य व्यवस्थापक अमिताभ मुखर्जी म्हणाले, “अभूतपूर्व मुसळधार पाऊस असूनही 41 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचा टप्पा ओलंडत, एनएमडीसीने आपली ताकद, लवचिकता आणि देशाची खनिजाची गरज भागवण्यासाठीची वचनबद्धता सिद्ध केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातल्या चौथ्या तिमाहीतील सर्वोत्तम उत्पादनामुळे एनएमडीसी आता योग्य गतीने पुढच्या आर्थिक वर्षात प्रवेश करत आहे.”

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.