Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी – हंसराज अहीर

मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी – हंसराज अहीर

मोदी सरकारच्या कार्यकाळात देश आर्थिक संपन्न, विकास, अंतर्गत सीमा सुरक्षेत यशस्वी - हंसराज अहीर

चंद्रपूर 4 जून (हिं.स.) – २०२४ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरामध्ये मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात लोक कल्याणकारी योजना, धाडसी निर्णय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उज्ज्वल करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कामगिरी गावा – गावात प्रसार करण्याचे योजिले असल्याची माहिती चंद्रपूर लोकसभा क्षेत्र महाजनसंपर्क अभियानाचे संयोजक हंसराज अहीर यांनी येथे बोलताना दिली.

मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने चंद्रपूर शहरातील हॉटेल मयुरच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रपरीषदेला ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. डॉ संदीप धुर्वे, भाजपा चंद्रपूर अध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना हंसराज अहीर यांनी भाजपाच्या सेवा, सुशासन, गरिब कल्याण भुमिकेची स्पष्ट माहीती दिली. मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3.5 करोड पेक्षाही जास्त कुटूंबाना पक्के घरे, ग्रामीण भागात 2023 पर्यंत 100 टक्के शौचालयाचे उद्दीष्ट गाठल्याचे यश, 12 करोड लोकांच्या घरामध्ये नळातून स्वच्छ पेयजलाची व्यवस्था, 9.6 करोड कुटूंबियांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध, कोविड संक्रमण काळात 80 करोड पेक्षा अधिक नागरिकांना अन्नधान्य मोफत दिले, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, मोदींच्या राजवटीत युरीया तसेच अन्य खतांच्या किंमती स्थिर, जागतिक स्तरावरील पहिल्या सुक्ष्म द्रव युरिया प्रकल्पाची उभारणी मोदी सरकारनी केली. केंद्र सरकारने आर्थिक गरजांवर आधारीत धोरणांनुसार आर्थिक दुर्बल घटकांकरिता 10 टक्के शैक्षणिक आरक्षण. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा. देशातील दिव्यांगांची होणारी सामाजिक उपेक्षा लक्षात घेता दिव्यांग प्रवर्गात वाढ करित 7 वरून 21 आजार समाविष्ट करण्यात आले. मागील 9 वर्षात मोदी सरकारने देशात 74 नविन विमानतळाची उभारणी केल्याचे सांगितले.

देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे मोदी सरकारचे धोरण असून आयआयटी, आय.आय.एम व विद्यापिठांची उभारणी केली आहे. मोदी सरकारच्या काळात एकूण 309 नव्या विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली आहे. ईशान्य भारताला जोडण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी धारेणद्वारे नव्या विस्तार योजना, नवे महामार्ग, नवे एअरपोर्ट व नव्या पुलांची निर्मिती, 9 वर्षाच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च स्थान देत पाकिस्तानी आतंकवाद निपटून काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हवाई हल्ले करीत राष्ट्रविरोधी शक्तींवर नियंत्रण, एक भारत एक संविधान तत्व स्विकारत कलम 370 व 35 ए रद्द केल्याची माहिती हंसराज अहीर यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.