Home मराठी बातम्या पायाभूत सुविधा आणि विकास कामे सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे – आ.संग्राम जगताप

सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे – आ.संग्राम जगताप

सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे - आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून (हिं.स.):- नगरकरांचे अनेक वर्षाचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल टाकत महानगराकडे वाटचाल करत आहे.सर्वांच्या सहकार्यातूनच शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे.खड्डेयुक्त शहरा ची ओळख पुसण्या साठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत.शहराच्या वैभवात व सौंदर्यकरणात भर पडावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी माजी पालकमंत्री हसनमुश्रीफ यांच्या माध्यमा तून बुरूडगाव रोडवरील साई उद्यान येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चून म्युझिकल फाउंटनचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सावेडीकरां साठी गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटची लवकरच निर्मिती होणार आहे.तसेच माऊली चौक ते नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी नवीन रस्त्याची निर्मिती केली.याचबरोबर मिस्किन मळ्यातील पुलाचे कामही मार्गी लागणार आहे.शहरामध्ये नवनवीन संकल्पना राबवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.नगरसेविका शोभा बोरकर यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागत आहे,असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून तारकपूर रस्ता ते गंगा उद्यान चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला.या प्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते.

नगरसेविका शोभा बोरकर म्हणाल्या की,तारकपूर मिश्किल मळा रस्ता हा सावेडी उपनगराला जोडणारा मह त्त्वाचा रस्ता आहे.दिवसेंदिवस रहदारीचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे.आ. संग्राम जगताप यांच्यामुळे तारकपूर मिस्कीन मळा रस्त्याचे काम याचबरोबर प्रभागातील विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावली जात आहे.टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध व कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावू असे त्या म्हणाल्या.

विनायक लिपाने म्हणाले की,आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासाची जबाबदारी खऱ्या अर्थाने हाती घेतले आहे.ते सर्वांना बरोबर घेऊन नियोजन बद्ध काम करत आहे.नगर शहरामध्ये सुरू असलेली विकास कामे पाहून आनंद होत आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.