Home मराठी बातम्या आरोग्य सुविधा डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवली, २२ मे (हिं.स.) : सोमवारी संध्याकाळी साड़े पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील पालिका विभागीय कार्यालयाजवळील पनवेल बस थांब्यासमोर राजू चौधरी या वृद्ध व्यक्तीस रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली. चौधरी हे एका कुरियर कंपनीत काम करत असून सामानाचे कुरियर घेऊन सायकलीवरून जात होते. या धडकेत वृद्ध व्यक्तीच्या पायाला मार लागला असून त्यांना बसता येत नव्हते. दरम्यान बघ्यांची गर्दी झाली पण कोणीही पुढाकार घेऊन मदतीस धावले नाही. त्यामुळे तो वृद्ध कळवळत मदतीची अपेक्षा करीत होता.

ज्या रिक्षामुळे वृद्ध जखमी होताच त्या वृद्ध व्यक्तीस रिक्षाचालकाने रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक असताना तो त्या ठिकाणाहून पळून गेला. वृद्धास काही नागरिकांनी फुटपाथवर झोपवले. या वृद्धास तात्काळ उपचार मिळणे गरजेचे होते. दरम्यान पादचारी दोन नागरिक व डोंबिवली पत्रकार संघाचे सचिव प्रशांत जोशी व उपाध्यक्ष शंकर जाधव यांनी भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांना संपर्क साधुन रुग्णवाहिका या ठिकाणी पाठविण्यास विनंती केली. पाटील यांनी तात्काळ सदर ठिकाणी वेळवर रुग्णवाहिका पाठविल्याने वृद्ध व्यक्तीस पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनाही पत्रकार जोशी आणि जाधव यांनी कॉल करून वृद्ध व्यक्तीबाबत माहिती दिली. डॉ.शुक्ला यांनीही यावेळी मदत केली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.