Home मराठी बातम्या आरोग्य सुविधा

Category: आरोग्य सुविधा

Post
'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार - उपमुख्यमंत्री

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई, 22 मे (हिं.स.) : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम...

Post
डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवलीत जखमी वृद्धास भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांनी दिली रुग्णसेवा

डोंबिवली, २२ मे (हिं.स.) : सोमवारी संध्याकाळी साड़े पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील पालिका विभागीय कार्यालयाजवळील पनवेल बस थांब्यासमोर राजू चौधरी या वृद्ध व्यक्तीस रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली. चौधरी हे एका कुरियर कंपनीत काम करत असून सामानाचे कुरियर घेऊन सायकलीवरून जात होते. या धडकेत वृद्ध व्यक्तीच्या पायाला मार लागला असून त्यांना बसता येत नव्हते. दरम्यान...

Post
चंद्रपूर : हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर : हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

चंद्रपूर 16 मे (हिं.स.):2023 मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, 65 वर्षांवरील व्यक्तींना सीझनल इनफ्लूएंझा लस...

Post
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

सातारा, 13 मे (हिं.स.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी डॉक्टर आणि रुग्णांशी...

Post
सीएपीएफ, एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांच्या भोजनात श्री अन्न समाविष्ट करण्याचा गृह मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सीएपीएफ, एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांच्या भोजनात श्री अन्न समाविष्ट करण्याचा गृह मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 4 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष-2023 अंतर्गत, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) कर्मचाऱ्यांच्या भोजनामध्ये भरडधान्य (श्री अन्न) समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे.केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या आवाहनानुसार, सर्व दलांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर 30% भरडधान्यांचा समावेश...

Post
अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 5.20 कोटी लोकांची नोंदणी

अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत 5.20 कोटी लोकांची नोंदणी

नवी दिल्ली, 28 एप्रिल (हिं.स.) : केंद्र सरकारच्या अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत(एपीवाय ), 31 मार्च 2023 पर्यंत, 5.20 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षातच या योजनेअंतर्गत, 1.19 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात, 99 लाख लोकांनी ही नोंदणी केली होती, त्या तुलनेत यंदा त्यात 20 टक्क्यांची वाढ दिसते आहे. आतापर्यंत,...

Post
येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा - अमित शाह

येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा – अमित शाह

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू. येणाऱ्या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आज आपण व्यसनाविरुद्धच्या युद्धात अशा ठिकाणी आहोत की इथून दृढसंकल्प, सामूहिक प्रयत्न, एकसंघता आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन घेऊन पुढे गेलो तर...

Post
देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

देशातील आरोग्य मंत्र्यांची आज बैठक

नवी दिल्ली, 07 एप्रिल (हिं.स.) : गेल्या काही दिवसापासून देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. यापार्श्वभुमीवर आज, शुक्रवारी 7 एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील...

Post
सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

सार्वजनिक आरोग्य सेवांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.) : उत्तर प्रदेशात कौशांबी येथे वैद्यकीय व्हॅनचा वापर करून सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील खासदार विनोद सोनकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये वैद्यकीय व्हॅनच्या सहाय्याने 2,47,500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी झाल्याची आणि या ठिकाणी 25000 पेक्षा अधिक लोकांनी विविध सरकारी योजनांचे लाभार्थी...

Post
पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 मार्च) वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद...