Home मराठी बातम्या निवडणूक कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

कर्नाटकसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली, 25 मार्च (हिं.स.) : काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे.

काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा कर्नाटक सरकारमध्ये परतण्याची आशा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण बहुमतासाठी तो कमी पडला होता. यानंतर राज्यात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीने सरकार स्थापन केले. मात्र, हे युतीचे सरकार 5 वर्षे टिकू शकले नाही आणि भाजप पुन्हा सत्तेत आले. आता सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने राज्यभरात पक्षाची मोटी बांधत निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.