Home मराठी बातम्या निवडणूक कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

कर्नाटक : भाजपने जाहीर केली पहिली उमेदवार यादी

नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज, मंगळवारी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पहिल्या यादीत 52 नवीन नावे आहे

भाजपच्या पहिल्या यादीत ओबीसीचे 32, अनुसूचित जातीचे 30 आणि अनुसूचित जमातीमधील 16 उमेदवार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत 9 डॉक्टर, सेवानिवृत्त आयएस, आयपीएस, 32 पदव्युत्तर आणि 8महिलांना तिकीट दिले आहे. त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. पक्ष उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर करणार आहे कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. कर्नाटकात 5.21कोटी मतदार आहेत, जे 224 विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.