Home मराठी बातम्या अर्थकारण आणि आर्थिक घडामोडी शहराच्या विकासातून व्यवसायिकरणाला चालना मिळाली – आ.संग्राम जगताप

शहराच्या विकासातून व्यवसायिकरणाला चालना मिळाली – आ.संग्राम जगताप

शहराच्या विकासातून व्यवसायिकरणाला चालना मिळाली - आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या विकासाला सर्वांच्या सहकार्यातून गती मिळाली असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने विकसित होत आहे.लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शहराच्या विकासातून व्यावसायिकरणाला चालना मिळाली आहे.ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू आता आपल्या शहरांमध्येच मिळत असल्याने आता पुणे,मुंबई येथे जाण्याची गरज नाही.सावेडी कॉटेज कॉर्नर येथे बारस्कर फर्निचर मॉलच्या माध्यमातून एकाच छता खाली फर्निचरच्या विविध वस्तू मिळणार आहे.फर्निचर व्यवसायामध्ये असलेल्या तीस वर्षाच्या अनुभवामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.शहरांमध्ये आता ब्रॅण्डेड वस्तूचे दालने सुरू होत आहे.त्या माध्यमातून शहरा च्या वैभव भर पडली आहे.युवक युवतींना रोजगार निर्मिती होत असते.जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर बारस्कर फर्निचर मॉल नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

सावेडी कॉटेज कॉर्नर येथे बारस्कर फर्निचर मॉलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

बारस्कर फर्निचर मॉलचे संचालक मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणले की,सावेडी कॉटेज कॉर्नर येथे बारस्कर फर्निचर मॉल च्या माध्यमातून ग्राहकांना एकाच छताखाली फर्निचरच्या विविध वस्तू मिळणार आहे.१९९० साली स्टील फर्निचर व्यवसायाच्या माध्यमातून काम सुरु केले.आता ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर बारस्कर फर्निचर मॉलने भरारी घेतली आहे.नगर शहर व जिल्ह्यातील ग्राहकांसाठी कंपनी ते ग्राहक अशा थेट फर्निचरच्या विविध दर्जेदार आकर्षित वस्तू,लग्न समारंभ, कार्यालयीन कामकाजासाठी,शालेय तसेच घराच्या सजावटीसाठी उत्तम दर्जाचे फर्निचर बारस्कर फर्निचर मॉलमध्ये उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.