Home मराठी बातम्या शेती उद्योग शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

नाशिक, 31 मे (हिं.स.)- सतत शेतीमालाचे भाव पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलनाची धास्ती प्रशासनाने घेतली असून नाशिक शहरात कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत 13 जून पर्यंत मनाई देश लागू करण्यात आला आहे

नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतीमालाचे भाव हे पडत आहेत त्यामुळे चार दिवसापूर्वीच टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन केले होते त्यानंतर सातत्याने भाव घसरत असल्याचे लक्षात आल्यामुळे आता पोलिसांनी काळजी घेतली असून आंदोलनाला थांबविण्यासाठी म्हणून नाशिक शहरात 13 जून पर्यंत म्हणाया देश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लागू केला आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.