Home मराठी बातम्या गुन्हा ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

ईडीने दाखल केला बीबीसी विरोधात गुन्हा

मुंबई, 13 एप्रिल (हिं.स.) : ब्रीटीश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनच्या (बीबीसी-इंडिया) विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने बीबीसी विरोधात परकीय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बीबीसी इंडियावर फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बीबीसीवर विदेशी निधीमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर ईडीने फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.काही दिवसांपूर्वी बीबीसी गुजरात दंगलीवरील माहितीपटाच्या संदर्भात वादात सापडले होते. केंद्र सरकारने माहितीपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मागच्या वर्षी आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयातही झडती घेतली होती. त्यानंतर मिडीयाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, भारतीय संस्थेने आपले अधिकार अबाधित ठेवत आणि राजकारणापासून लांब राहत नियमानुसार कारवाई सुरू केल्याची माहिती ईडीतील सूत्रांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.