Home मराठी बातम्या गुन्हा मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातील वारजे येथून अटक केलीय. सदर आरोपीने दारूच्या नशेत सोमवारी 10 एप्रिल रोजी रात्री पोलिसांना 112 या क्रमांकावर कॉल करून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती.

यासंदर्भातील माहितीनुसार पोलिसांना सोमवारी रात्री 112 क्रमांकावरवर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून कॉलरने कॉल कट केला. डायल 112 चे कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा कॉल आला होता. या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचे लोकेशन त्यांनी ट्रेस केले. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले. परंतु, पोलिसांना या इसमाला ताब्यात घेतले तेव्हा तो दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने ऍम्ब्युलन्ससाठी कॉल होता. परंतु, ऍम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर असून त्याने नशेच्या अंमलाखाली मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.