Home मराठी बातम्या इतर सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापुरात फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्धाला भोवळ

सोलापूर , 25 मे, (हिं.स.) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण होणार आहे. यावेळी पक्षाचा मेळावा देखील होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आली, हा वृद्ध फडणवीसांना निवेदन देत होता, यावेळी तो खाली कोसळला.देवेंद्र फडणवीस यांनी वृद्धाची विचारपूस केली. व तात्काळ पाणी मागवले. तसेच गर्दी कमी केली. वृद्ध शेतकरी ९६ वर्षाचे आहेत. ते गेले अनेक वर्ष कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहेत. त्यांनी अनेक आंदोलने देखील केली. मात्र त्याची आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.