Home मराठी बातम्या इतर सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

सिंधी समाजाची जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार

नाशिक, ०३ जून (हिं.स.) : उल्हासनगर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासाठी सिंधी समाजाच्या वतीने नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या २७ मे रोजी उल्हासनगर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलताना सिंधी समाजाबद्दल अक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे संपुर्ण सिंधी समाजाचा अपमान झाल्याने सिंधी समाजात रोष निर्माण झाला आहे. सिंधी समाज अशा प्रकारचे अपमान सहन करणार नाही. या बाबतीत निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने अशा या बेजबाबदारपणे वक्तव्य करणा-या जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध भा. द. वि. कलम २९५ ए प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी याकरिता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याचाच भाग म्हणून नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ऍड प्रकाश आहुजा, दिनेश साधवानी, दिनेश दासवानी, नवीन केवलानी, जयेश मखिजा, दिनेश दासवानी, राज बांबानी, रतन चावला, नितीन कारडा, बंटी दासवानी, सुदर्शन चंदनानी, अमित रोहिरा, किशन आहुजा, सोनू रामवाणी सह सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.