Home मराठी बातम्या इतर आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, 2 जून (हिं.स.) आईसीएसी आणि जे एस आर्ट गॅलरी आयोजित भव्य कला महोत्सव “द आर्ट फेअर” चे आयोजन दि. १ ते ४ जून, २०२३ हया दरम्यान करण्यात आले आहे. हा भव्य कला महोत्सव मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात आला असून ११ ते ७ हया वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. हया कला मेळाव्याचे उद्घाटन भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विनोद शेलार, अमित बारूट, हिमांशु शाह, डॉ मुदास्सिर ख्वाजा यांच्यासहीत कला व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर कला मेळाव्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ४०० पेक्षा जास्त चित्रकार व शिल्पकार भाग घेतला असून त्यांच्या १५०० च्यावर कलाकृतींचा व ५० विविध कलादालनांचा समावेश करण्यात आला आहे.

इंटरनेशनल क्रिएटिव आर्ट सेंटर (आईसीएसी) चे संस्थापक श्री. रविंद्र मारडिया व जे एस आर्ट गॅलरीचे संस्थापक श्री. सूरज लाहेरू यांनी आयोजित्त केलेल्या हया कला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार व शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्रोंझ, फोटोग्राफी, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले आहे. विद्यमान कलाजगतातील चित्रकारांच्या व शिल्पकारांच्या विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण अशा १५०० च्यावर कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी सर्व कलाप्रेमी व रसिकांना हया कला मेळाव्यात पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हया प्रदर्शनात अनेक चित्रकारांचा लाईव्ह डेमो पाहायला मिळणार असून कला परीक्षकांद्वारा निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट अशा चित्रकार व शिल्पकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

सदर कला मेळाव्यात राबी आर्ट गॅलरी (शांतिनिकेतन), डोलना आर्ट गॅलरी (मुंबई), तूलिका आर्ट गॅलरी (मुंबई), एमिनेंट आर्ट गॅलरी (दिल्ली), गॅलरी 16 (दिल्ली), जेड आर्ट गॅलरी (मुंबई), डेसर्ट आर्ट गॅलरी (दुबई), कला संस्कृती आर्ट गॅलरी (मुंबई), प्राची आर्ट गॅलरी (मुंबई), श्रीजन आर्ट गॅलरी (नवी मुंबई) हया आर्ट गॅलरीचा समावेश असून रबींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, बिनोद बिहारी मुखर्जी, रामकिंकर बैज, एम एफ हुसैन, एफ एन सौजा, गणेश पायने, सोमनाथ हारे, सुहास रॉय, शक्ति बर्मन, जामिनी रॉय, बिकास भट्टाचार्य, लालू प्रसाद शॉ, के जी सुब्रमनियन, के लक्ष्मण गौड़, जोगेन चौधुरी, बोस कृष्णामाचारी, माधवी पारीख, परेश माइटी या नामांकित चित्रकारांच्या कलाकृती पाहायला मिळतील. हा कला मेळावा ४ जून पर्यंत रोज ११ ते ७ हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.