Home मराठी बातम्या इतर नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : 21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आठवण करून दिली आहे. या दिनासाठी आपण सज्ज होऊया, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी ही प्राचीन परंपरा साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

आयुष मंत्रालयाच्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले; “आंतरराष्ट्रीय योग दिनाला फक्त तीन आठवडे राहिले आहेत.

आपल्या मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्तीत वाढ करणारी ही प्राचीन परंपरा साजरी करण्यासाठी आपण सज्ज होऊया. चला एक अधिक निरोगी आणि आनंदी समाज निर्माण करूया.”

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.