Home Shivsena

Political parties: Shivsena

Post
महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

महायुती म्हणूनच यापुढील निवडणुका लढविणार – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : राज्यातील यापुढील ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार आहोत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे प्रसारमाध्यमांना दिली. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरीत आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Post
कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते....

Post
नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) – शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला थुंकल्याच्या निषेधार्थ शहरात दिल्लीगेट वेस समोर शिवसे नेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, त्यांची प्रतिमा पायाखाली तुडविण्यात आली. अनिल शिंदे म्हणाले की,राजकारणातील मूर्खपणाचा कळस म्हणजे संजय राऊत...

Post
शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

सातारा, 4 जून (हिं.स.) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे...

Post
चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी 'आई' हरपली - मुख्यमंत्री

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री

मुंबई, 4 जून (हिं.स.) “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण...

Post
संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे 'जोडे मारो' आंदोलन

संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

अमरावती, 3 जून (हिं.स.) :शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानिसक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टिका करत, राऊत यांचा प्रतिकात्मक फोटो असलेल्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ...

Post
आमच्यावर किती अन्याय झाला तरी पक्ष सोडून गेलो नाही - संजय राऊत

आमच्यावर किती अन्याय झाला तरी पक्ष सोडून गेलो नाही – संजय राऊत

नाशिक, ३ जून (हिं.स.)- ज्याच्या जवळ त्यालाच कळतं असे म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना टोला दिला असून आमच्यावरती कितीही दडपण आलं तरी आम्ही पक्ष सोडून कधी गेलो नाही, असा चिमटा देखील काढला आहे. संजय राऊत यांनी शनिवारी त्रंबकेश्वर येथे जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्यावरती अनेक...

Post
मुख्यमंत्री करणार आगरी-कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन !

मुख्यमंत्री करणार आगरी-कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन !

डोंबिवली, ०२ जून (हिं.स.) : आगरी-कोळी वारकरी भवन” कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते बुधवार ७ जून रोजी बेतवडे—उसरघर सीमा प्रांत, दिवा (पूर्व) येथे होणार आहे. सदर भूमिपूजन सोहळ्याच्या समारंभाचे कामकाजाचे नियोजन विषयी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मानपाडा येथील श्री मानपाडेश्वर मंदिरात सभा घेण्यात आली. सभेसाठी वारकरी संप्रदाय, सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि...

Post
मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार - दीपक केसरकर

मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार – दीपक केसरकर

मुंबई, 2 जून (हिं.स.) : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...

Post
छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार - मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार – मुख्यमंत्री

मुंबई, 1 जून (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य...