Home राजकारण

Category: राजकारण

Post
मुख्यमंत्र्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

मुख्यमंत्र्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

रायगड, 20 मार्च (हिं.स.) : चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली असता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चवदार तळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत ते बुद्धवंदनेत सहभागी झाले होते. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,...

Post
शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही - गिरीश महाजन

शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही – गिरीश महाजन

नांदेड, 19 मार्च (हिं.स.) गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले होते. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा...

Post
ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीचे मिंधे झालेत - प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे मिंधे झालेत – प्रा. जोगेंद्र कवाडे

ठाणे, 19 मार्च, (हिं.स.) आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मिंधे सरकार असा करीत आहेत. पण, गेली अडीच वर्षे ठाकरे पिता-पुत्र सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिंधे झाले होते, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. दरम्यान, ठाण्यातील गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून ते सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही...

Post
बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

बाळासाहेबांप्रमाणेच कोकणाकडे लक्ष दिले जाईल – मुख्यमंत्री

रत्नागिरी, 19 मार्च, (हिं. स.) : बाळासाहेबांनी जसे प्रेम दिले, तसे कोकणाकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. खेड येथे आज आयोजित सभेत ते बोलत होते. खेडमधील महाड नाका येथील एसटीच्या मैदानात शिवसेनेतर्फे निष्ठावंतांची ही सभा झाली. यावेळी हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तीकर,...

Post
Ration card lost in ahmednagar

हजारो रेशनकार्ड गहाळ होऊनही जिल्हा पुरवठा विभागाचे गंभीर दुर्लक्ष

शेवगाव तालुक्यातील कोट्यवधी रुपयाच्या रेशन भ्रष्टाचारासह रेशन कार्ड गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडील दीर्घ प्रलंबित चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्रव्यवहार नंतरही दिले जात नसल्याच्या निषेधार्थ तसेच पुरवठा कार्यालयातून हजारो रेशन कार्ड गहाळ होऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून दोषींना वाचविण्यासाठी बचाव केला जात असून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Post
जलजीवन मिशन कामाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही - आ. नितेश राणे

जलजीवन मिशन कामाच्या दर्जात तडजोड खपवून घेणार नाही – आ. नितेश राणे

जलजीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.ती यशस्वी आणि जनतेच्या फायद्याची ठरली पाहिजे.भविष्यात गाव पाणी टंचाई पासून मुक्त झाले पाहिजेत, त्यासाठी या योजनेचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. वापरण्यात येणारे पाईप योग्य दर्जाचे आहेत का ? याची खात्री करा. केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात पाईपची व इतर साहित्यांची क्वालीटी पहा. साहित्य व कमाच्या...

Post
येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर "मेस्मा" लावतील - नरसय्या आडम

येत्या निवडणुकीत कर्मचारीच तुमच्यावर “मेस्मा” लावतील – नरसय्या आडम

सोलापूर 16 मार्च (सूत्र) राज्य शासनाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी अत्यावश्यक सेवा म्हणजेच “मेस्मा” कायदा मंजूर करून घेतला आहे. याला सत्ताधारीच काय? विरोधी एकाही पक्षाने यास विरोधच काय? चर्चाही न करता मंजूर केला, ही लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळे तुम्ही आता “मेस्मा” लावा. येत्या निवडणुकीत कर्मचारी व शिक्षक तुम्हाला “मेस्मा” लावतील, असा इशारा माजी आमदार नरसय्या...

Post
आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन

आरपीआय ओबीसी सेलचे जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन

अहमदनगर, 16 मार्च (सूत्र):- अपंग प्रमाणपत्राद्वारे सन २०२० मध्ये पदोन्नती घेणार्या सर्व शिक्षकांची शारीरिक तपासणी व प्रत्यक्ष अपंग प्रमाणपत्रातील टक्केवारीची चौकशी करुन या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण करण्यात आले. रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपोषणात शहर जिल्हाध्यक्ष...

Post
आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती वेतन बंद करा – खा. बाळू धानोरकर

आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती वेतन बंद करा – खा. बाळू धानोरकर

चंद्रपूर 16 मार्च (सूत्र) : भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक व्यक्तींना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व...