नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “सरथ बाबू जी हे अष्टपैलू आणि सर्जनशील कलाकार होते. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत विविध भाषांमधील अनेक लोकप्रिय भूमिकांसाठी ते स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांबद्दल सहवेदना. ओम शांती.”
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply