नाशिक, १५ मे (हिं.स.) : नाशिकच्या सहकार विभागातील लाचखोर उपनिबंधकाला आज, सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलीय. त्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलीय. सतीश खरे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून एसीबीने सोमवारी रात्री ९ वाजता खरे यांना ३० लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply