नवी दिल्ली, 14 मे (हिं.स.) : वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
वॉलमार्ट यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. वेगवेगळ्या विषयांवर आमची अभ्यासपूर्ण चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे पाहून आनंद झाला.”
हिंदुस्थान समाचार
NNNN
Leave a Reply