Home राजकारण चंद्रपूर : उमेदच्या वतीने १११६ गावांमध्ये आरोग्यविषयक जागृती

चंद्रपूर : उमेदच्या वतीने १११६ गावांमध्ये आरोग्यविषयक जागृती

चंद्रपूर : उमेदच्या वतीने १११६ गावांमध्ये आरोग्यविषयक जागृती

चंद्रपूर 12 मे (हिं.स.): राज्याच्या ग्रामविकास विभाग यांचे वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव सामाजिक समावेशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एकूण १११६ गावांमध्ये एकाचवेळी किशोरवयीन मुली, स्तनदा माता व गरोदर माता यांची आरोग्य, पोषण आहार या विषयावर विविध उपक्रमांव्दारे जागृती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव २.० या देशव्यापी कार्यक्रम अंतर्गत टप्पेनिहाय विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. 10 एप्रिल रोजी आरोग्य, पोषण आहार या विषयावर जागृती करण्यात आली. युवावस्थेतील मुलींच्या समस्या, पोषण, आरोग्यविषयक काळजी व त्यावरील उपाय याबाबत समुदाय संसाधन व्यक्ती यांनी जागृती केली. पोषणाचे महत्व आणि विविध जीवनसत्वाच्या शारीरीक वाढीसाठी गरजा आणि पर्यायी भाजीपाला, फळे, दूध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्तनदा माता यांचे आरोग्य आणि लहान बाळांच्या पोषणाबाबत काळजी यावरही एकुण 1116 गावांमध्ये जागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. सभा, फलके, बैठका, रॅली तसेच मान्यवरांकडून मार्गदर्शन व्दारे जागृती करण्यात आली. आयोजनासाठी स्वयंसहायता समुह, ग्रामसंघ तसेच प्रभाग संघांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.