डोंबिवली, ०२ जून (हिं.स.) : आगरी-कोळी वारकरी भवन” कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते बुधवार ७ जून रोजी बेतवडे—उसरघर सीमा प्रांत, दिवा (पूर्व) येथे होणार आहे. सदर भूमिपूजन सोहळ्याच्या समारंभाचे कामकाजाचे नियोजन विषयी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मानपाडा येथील श्री मानपाडेश्वर मंदिरात सभा घेण्यात आली. सभेसाठी वारकरी संप्रदाय, सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या महत्वाच्या बैठकीसाठी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, दत्ता वझे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, अभिजित दरेकर, जतिन पाटील, सागर जेधे, माजी नगरसेवक नितीन पाटील, जालिंदर पाटील, अर्जुन पाटील, शरद पाटील, बाळकृष्ण महाराज, जयेश महाराज, गणेश महाराज, प्रकाश महाराज, पाच गावातील महिला वारकरी व वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित होते.
सदगुरु श्री वामनबाबा महाराज, सदगुरु श्री सावळाराम महाराज म्हात्रे, सदगुरु श्री वासुदेवबाबा महाराज म्हात्रे यांच्या कृपाशिर्वादाने तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने आगरी कोळी वारकरी भवन विकास काम मंजूर झालं आहे. आगरी-कोळी समाज हा ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील भूमिपूत्र असून तो राज्याच्या तसेच देशाच्या अनेक भागात वास्तव्य करत आहे. हा समाज धार्मिक वृत्तीचा असून वारकरी संताच्या विचाराने चालणारा आहे. समाजाच्या अनेक सांस्कृतिक परंपरा अभिमानास्पद अशाच आहेत. समाजाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी व संवंर्धित करण्यामागे वारकरी संत साहित्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रस्तावित “आगरी-कोळी वारकरी भवन” चे योगदान महत्वाचे राहणार आहे. या वास्तूच्या उभारणीसाठी आयोजित करण्यांत आलेल्या भूमिपूजनाचा सोहळा ही सर्वांच्या विचाराने, सहभागाने, थाटामाटाने मंगलमय वातावरणात संपन्र व्हावा असे यावेळी सर्व मान्यवरांच्या मताप्रदर्शनातून दिसून आले.
यावेळी ह.भ.प. जयेश नारायण म्हणाले, भजन स्पर्धा आजोजित करावी, साडे तीन दिवसांचा उत्सव करण्याचा विचार होता या मात्र वेळ कमी आहे.आगरी-कोळी समाजातील संघटना या सोहळ्यात नक्कीच उपस्थित राहणार. तर गुलाब वझे यांनी सांगितले की, सर्वसमर्पक असा कार्यक्रम करण्यावर आपण सर्वांनी भर दिला पाहिजे. नियोजनाप्रमाणेच मुख्य कार्यक्रम केला तर तो नक्कीच सफल होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आपल्याला नेहमीच पाठींबा मिळतो त्यामुळे सर्व काही समाज्याच्या2 मनाप्रमाणेचा होईल. या नियोजन सभेसाठी महिला वर्गाची उपस्थिती मोठी होती. या चांगल्या कार्यासाठी समाजातील मान्यवर मंडळीचेही नक्कीच सहकार्य मिळेल असा आशावाद गुलाब वझे यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply