बीड, 1 जून (हिं.स.) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नावे आज जाहीर केली. दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित २१ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
कारखान्याचं हित महत्वाचं म्हणूनच बिनविरोध निवडीचा निर्णय
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या हया परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी मिळून बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचं सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असंही त्या यावेळी म्हणाल्या.
हे संचालक बिनविरोध विजयी
पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे
पांगरी गट – श्रीहरी मुंडे, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे
नाथरा गट – सतीश मुंडे, राजेश गिते, अजय मुंडे परळी गट – पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक,सिरसाळा गट – सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतु कराड,
धर्मापूरी गट – शिवाजीराव गुट्टे, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे
सहकारी संस्था मतदारसंघ – सत्यभामा उत्तमराव आघाव
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – मंचक घोबाळे
महिला प्रतिनिधी – पंकजा मुंडे, ॲड. यशश्री मुंडे
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – केशव माळी, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी – वाल्मिक कराड
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply